‘इंटलेक्चुअल अॅक्टिव्हिझम’ ही कुमारनं आमच्या पिढीला दिलेली देणगी आहे!
कुमार कितीतरी विशालपटाचा आणि त्रिकालाचा वेध सतत घेत असतो. कुमारचा विषय निघाला की थोरोचं एक वाक्य मला नेहमी आठवतं- ''If a soldier marches out of sync with his companions, perhaps he hears a different drummer.'' This probably explains Kumar in absolute. कुमार हा असा सतत त्याची वैचारिक आयुधं परजत जीवनाच्या, समाजाच्या, राजकारणाच्या सर्वांगांना भिडत असतो आणि आपल्याला भिडायचं आवाहन करत असतो.......